Motilal Oswal Trophy (Snooker) : आरव संचेतीसह सचिन बिचे, जेसन मल्होत्रा उपांत्यपूर्व फेरीत….

पुणे – डेक्कन जिमखाना क्लब तर्फे आयोजित ‘मोतीलाल ओसवाल करंडक’ डेक्कन जिमखाना अखिल भारतीय खुल्या स्नुकर स्पर्धेत पुण्याच्या आरव संचेती, जेसन मल्होत्रा, पिनाक आनप, सचिन बिचे, आनंद रघुवंशी आणि महेश जगदाळे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. ज्युनिअर गटामध्ये आरव संचेती, आयान शेख, अथर्व साठे आणि आर्यन मारभाल यांनी उपांत्य फेरी गाठली.
डेक्कन जिमखाना क्लबच्या स्नुकर हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेच्या उप-उपांत्यपुर्व फेरीत जेसन मल्होत्रा याने अश्विन पळणीटकर याचा ६३-३१, ३९-२७, ८३-२८ असा पराभव केला. पिनाक आनप याने अमोघ बंदीचोडे याचा ७१-५९, ३६-२८, ८३(६९)-१७ असा सहजपराभव केला. सचिन बिचे याने कृष्णराज अरकोट याचा ५६-४१, ३७-०८, ३७-६०, ३३-१३ असा पराभव करून उपांत्यपुर्व फेरी गाठली.
Motilal Oswal Trophy : स्नुकर स्पर्धेत सुरज, अभिजीत उपांत्यपूर्व फेरीत…
१३ वर्षीय आरव संचेती याने चमकदार कामगिरी करताना कैवल्य जाधव याचा ८५-३५, ४१-३९, ६३-७१, ३६-२९ असा पराभव करून आगेकूच केली. ज्युनिअर गटामध्ये आर्यन मारभाल याने ओवेस शेख याचा ३०-१५, २९-१८ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
अथर्व साठे याने राजवीर राजाध्यक्ष याच्यावर ४३-१९, ५१-२१ असा पराभव केला. आरव संचेती आणि आयान शेख यांनीही गुणतक्त्यामध्ये अव्वल स्थान मिळवत उपांत्य फेरी गाठली.





