नालगोंडा (तेलंगणा) : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे वर्णन मातेचे केले जाते. मात्र त्या ऐवजी माता न तू वैरीणी असे म्हणावे, असे वर्तन एका महिलेने केल. तिने आपले अनैतिक संबंध लपवण्यासाठी आपल्या नऊ वर्षाच्या पोटच्या गोळ्याचा गळा घोटला. या घटनेने खळबळ उडाली आहे.
त्या महिलेचे अन्य एका पुरूषासोबत अनैतिक संबंध होते. तिचा पती बोअरवेल खोदण्याचे काम करत असे. तो कामावर गेला की यांचे चाळे सुरू होत. काल सायंकाळी यांचे चाळे मुलाने पाहिले. तो ही गोष्ट आपल्या पतीला सांगेल, अशी भीती या महिलेला वाटू लागली.
तिने टॉवेलने गळा आवळून मुलाचा खून केला. त्यानंतर तिने काही घडले नसल्याचा आव आणला. मात्र पतीला संशय आला. त्याने तिच्या विरूध्द पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी चौकशीत पोलिसांच्या प्रश्नाच्या सरबत्तीसमोर ती फार काळ टिकाव धरू शकली नाही. तिने आपला गुन्हा कबूल केला, अशी माहिती देण्यात आली.