बार्सिलोना : लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साईना नेहवाल हिला स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या तिस-या मानांकित बुसानन ओंगबामरूंगफान हिने साईनाचा २२-१०, २१-१९ असा पराभव केला.
Barcelona Spain Masters 2020
WS – Quarter final
22 21 🇹🇭Busanan ONGBAMRUNGPHAN🏅
20 19 🇮🇳Saina NEHWAL🕗 in 45 minutes
https://t.co/4CU0K4VI7V— BWFScore (@BWFScore) February 21, 2020
यापूर्वी, साईनाने महिला एकेरीच्या दुस-या फेरीत मारियाचा २१-१०, २१-१९ असा पराभव करत आगेकूच केली होती. तर पहिल्या फेरीत पाचव्या मानांकित साईनाने जर्मनीच्या व्होनी लीवर हिचा २१-१६, २१-१४ असा पराभव केला होता.