लातूर – सासूची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास वीर हणमंतवाडी परिसरात घडली. रजनीकांत, आणि सासू चंद्रसेना अशी या घटनेत मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत.
रजनीकांत यांची पत्नी आपल्या 7 वर्षीय मुलासह लातूर शहरातील वीर हणमंतवाडी येथे माहेरी गेली होती. घरगुती कारणामुळे पत्नी पुन्हा नांदायला येत नसल्याने रजनीकांत यांचा त्यांची सासू चंद्रसेना यांच्यावर राग होता.
दरम्यान, मंगळवारी रात्री रजनीकांत याने हणमंतवाडी येथे येऊन सासूनवर कोयत्याने हल्ला करून त्यांचा खून केला. त्यानंतर त्याने त्याच्या मुलावरही हल्ला केला आणि स्वत: अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. या घटनेत सासू चंद्रसेना आणि जावई रजनीकांत यांचा मृत्यू झाला असून 7 वर्षीय मुलगा कार्तिक हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.