1092 जणांना लागण, 17 जणांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 29 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर आतापर्यंत 20 हजारहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. आज दिवसभरात शहरातील 1092 जणांना करोनाची लागण झाली. आतापर्यंत शहरात 29,157 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर 601 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 952 रुग्णांना घरी सोडण्यात आले.
आज चार वाजेपर्यंत शहरातील 1092 जणांना करोनाची लागण झाली आहे. शहरातील एकूण रुग्णांची संख्या 29,157 इतकी झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत शहरात 5257 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 386 रुग्णांचाही समावेश आहे.
रविवारी दिवसभरात 17 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 10 तर शहराबाहेरील 7 रुग्णांचा बळी गेला. शहरातील विविध रुग्णालयात चिंचवड, चिखली, किवळे, काळेवाडी, भोसरी, खराळवाडी येथील 6 जणांवर उपचार सुरू होते. त्यांचे आज उपचारा दरम्यान निधन झाले.
तर पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील रहिवाशी असलेले मात्र पुणे शहरात उपचार घेत असलेल्या चिखली, चिंचवड व बोपखेल येथील 4 रुग्णांचाही आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहराबाहेरील देहूरोड, कात्रज, चाकण, बिबवेवाडी, जळगाव येथील 7 रुग्णांचा मृत्यू झाला.