Shyam Rangeela Nomination Canceled| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशातील वाराणसीतून लोकसभा निवडणुक लढवणार आहे. यासाठी त्यांनी 14 मे रोजी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. विशेष म्हणजे मोदींच्या विरोधात कॉमेडियन श्याम रंगीलाने देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्याचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. याबाबत त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर माहिती देत नाराजी व्यक्त केली.
उमेदवारी रद्द झाल्यानंतर श्याम रंगीला म्हणाला, “वाराणसीतून आपल्याला उमेदवारी दिली जाणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. हृदय नक्कीच तुटले आहे, पण धैर्य तुटलेले नाही. तुमच्या सर्व सहकार्याबद्दल धन्यवाद. प्रसारमाध्यमांना आणि हितचिंतकांना विनंती आहे की, कृपया आता फोन करू नका, माझ्याकडे जी काही माहिती असेल, ती मी इथे देत राहीन, कदाचित आता थोडा वेळ बोलायची इच्छा नाही.”
नॉमिनेशन के पीछे का कारण जो चुनाव आयोग कार्यालय से आपको दिखा रहें है उसकी भी सच्चाई आपके सामने रख रहा हूँ,
लोकतंत्र में उन्हीं को लड़ने का अधिकार है जिन्हें आयोग चुनेगा 🙏🏽💔 pic.twitter.com/aBFK6Zejry— Shyam Rangeela (@ShyamRangeela) May 15, 2024
पुढे श्याम रंगीला म्हणाला, “आम्ही नेते नसून सामान्य जनता होतो आणि लढायला बाहेर पडलो होतो. तसेच, इंदूर आणि सुरतमध्ये जे काही घडले, ते आम्हाला चुकीचे वाटले, म्हणून आम्ही संदेश देण्यासाठी वाराणसीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.” उमेदवारी अर्ज भरताना घेतलेल्या शपथेची पूर्तता झाली नसल्याचे सांगत अर्ज बाद करण्यात आल्याचे ही श्याम रंगीलाने सांगितले.Shyam Rangeela Nomination Canceled|
दरम्यान, वाराणसी लोकसभा जागेसाठी सातव्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे. या जागेवर पीएम मोदी भाजपकडून तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढणार आहेत. तर इंडिया अलायन्सने अजय राय यांना या जागेवर उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय बसपकडून अतहर जमाल लारी हे देखील येथून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. Shyam Rangeela Nomination Canceled|
हेही वाचा :