राजगुरूनगर -खेड तालुक्यात 24 तासांत नव्याने 28 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. तर दोघांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांनी दिली.
खेड तालुक्यात 24 तासांत नाणेकरवाडी व भांबोली या दोन गावां तील 40 व 60 वर्षीय व्यक्तींचा मृत्यू झाल्याने तालुक्यातील मृतांची संख्या 47 वर पोहचली आहे. तालुक्यात आतापर्यंत बाधितांची संख्या 1799 झाली आहे, तर 1429 जणांनी करोनावर मात केली असून 323 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खेड तालुक्यात मागील 24 तासांत चाकण 8,आळंदी 0, राजगुरूनगर 3 अशा तीन नगर परिषदांमिळून 11 तर ग्रामीण भागातील खालूंब्रे (1), खराबवाडी (1), म्हाळुंगे (1), वाकी खुर्द (1), निघोजे (3), नाणेकरवाडी (1), शेलपिंपळ्गाव (3), भोसे (1),सोळू (1), काळूस (2), शिरोली (1), संतोषनगर (1) या 12 गावांत 17 अशा एकूण 28 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.