नवी दिल्ली : कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या घातक विषाणूमुळे आतापर्यंत २७ हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे तर, जगभरात या विषाणूचे २० लाखपेक्षा अधिक रुग्ण आहेत. जगभरात आतापर्यंत या विषाणूपासून ४ लाख ८६ हजार जण बरे झाले आहेत.
तर दुसरीकडे अमेरिकेनं डब्ल्यूएचओचा आर्थिक निधी बंद करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेने निधी थांबवल्याप्रकरणी ‘चीन’ने चिंता व्यक्त केली आहे. मागील २४ तासात अमेरिकेत २ हजार २२८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेने चीनवर आरोप केले
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ म्हणाले की, सुरुवातीला सर्वात जास्त गरज असताना चीनने अमेरिकन लोकांना प्रवेश दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ म्हणाले की, सुरुवातीला सर्वात जास्त गरज असताना चीनने अमेरिकन लोकांना प्रवेश दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नेपाळ पोलिसांची २ हजार ४२७ जणांवर कारवाई
नेपाळ सरकारने लॉकडाऊन दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या २ हजार ४२७ जणांवर कारवाई केली आहे. नेपाळमध्ये आतपर्यंत १६ जण कोरोना बाधित आहेत. बुधवारी कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी सरकारने लॉकडाऊन २७ एप्रिल पर्यंत वाढवला आहे.
चीनच्या वुहान शहरातील रुग्नालय तात्पुरते बंद
चीनच्या वुहान शहरातील फेब्रुवारी महिन्यात उभारण्ययात आलेले रुग्णालय तात्पुरते बंद करण्यात आले आहे. वुहान शहरात सुरवातीच्या दहा दिवसात १ हजारापेक्षा जास्त खताचे रुग्नालय उभारण्यात आले होते.