पिंपरी : करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर “घरी रहा, सुरक्षित रहा’, असे आवाहन सरकार करीत आहे. घरी थांबून त्यांची ही अपेक्षा आपण पूर्ण करू शकतो.
तेवढा खारीचा वाटा तर आपण नक्कीच उचलायला हवा, असे आवाहन अभिनेत्री आणि मॉडेल आशा नेगी यांनी “डिजिटल प्रभात’शी बोलताना केले. नेगी म्हणाल्या, “सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे प्रत्येकालाच घरात अडकून पडल्यासारखे वाटते आहे. कोणीही आनंदात घरात थांबलेले नाही.
मात्र, करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी घरात थांबणे खुप आवश्यक झाले आहे. डॉक्टर, स्वयंसेवी संस्था, पोलीस, प्रशासन आपापली कामे खुप चांगल्या पद्धतीने करीत आहेत. अशा परिस्थितीत सरकारने आपल्याला घरी थांबण्याचे आवाहन केले आहे. तेवढी अपेक्षा तर आपण नक्कीच पूर्ण करायला हवी.’