मुंबई : जगभरात कोरोनाचे 45 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. तर कोरोनामुळे गेलेल्या बळींची संख्या 303,345 गेली आहे. मागील 24 तासात 95,519 नवीन कोरोना केसेस समोर आल्या असून 24 तासात 5,305 लोकांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात तीन लाख तीन हजारांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 17 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.
वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात बाराव्या स्थानावर आहे. भारतात आत्ता कोविडचे 78,055 रुग्ण आहेत. तर भारतात कोरोनामुळं 2551 बळी गेले आहेत. जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत.
अमेरिकेत 1,456,745 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 86,900 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 33,614 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 233,151 इतकी आहे.
स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27,321 लोकांचा मृत्यू झालाय. 272,646 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 2,305 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 252,245 इतका आहे.