सातारा -जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 351 जणांचे अहवाल करोनाबाधित आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
आजच्या या करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या आणि आजअखेर बाधित रुग्णांची एकूण संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे आहे. जावळी 3 (9833), कराड 40 (38129), खंडाळा 14 (13880), खटाव 22 (24493), कोरेगाव 33 (21211), माण 8 (17044), महाबळेश्वर 2 (4592), पाटण 1 (9982), फलटण 90 (35254), सातारा 101 (49668), वाई 32 (15443) व इतर 5 (1929).
जिल्ह्यात आजअखेर बाधितांची एकूण संख्या दोन लाख 41 हजार 458 इतकी झाली आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 6059 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतून आणि करोना केअर सेंटरमधून शनिवारी संध्याकाळपर्यंत 164 जणांना घरी सोडण्यात आले आहे.