मान्सून आज देवभूमीत? किनारपट्टीवर धुमशान

पुणे – गेले काही दिवसांपासून चातकासारखी वाट पाहणाऱ्या मान्सूनच्या आगमनासाठी आवश्‍यक असणारी अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने उद्या (8 जून) मान्सून देवभूमी अशी ओखळ असलेल्या केरळमध्ये दाखल होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. नियोजन वेळेपेक्षा तब्बल आठ दिवस उशिराने मान्सूनचे केरळात आगमन होत आहे.त्याचबरोबर अरबी समुद्रांत कमी दाबाच्या क्षेत्र निर्माण होत असल्याचे किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्‍यता आहे.

मान्सूनने गेल्या आठवड्यात श्रीलंकेचा निम्मा भाग व्यापला आहे. तर अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात ही प्रगती केली आहे. विषुववृत्ताकडून येत असलेले वाऱ्यांचे प्रवाह, दक्षिण भागात समुद्र सपाटीपासून 3.1 ते3.6 किलोमीटर उंचीवर असलेले हवेचे पूर्व-पश्‍चिम जोडक्षेत्र, तसेच महाराष्ट्र आणि केरळच्या किनाऱ्याला समांतर हवेच्या कमी दाब पट्ट्याची होत असलेली निर्मिती, यामुळे शनिवारी (दि.8) केरळात दाखल होण्यास पोषक हवामान झाले आहे.

अरबी समुद्रात केरळ-कर्नाटक किनारपट्टीलगत हवेचे कमी दाब क्षेत्र तयार होत आहे. किनारपट्टीलगत उत्तरेकडे सरकत जाणारी ही प्रणाली आणखी तीव्र होत जाण्याचे संकेत आहेत. मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या या क्षेत्राच्या वाटचालीवर मान्सूनची प्रगती ठरणार आहे. तर बंगालच्या उपसागरावरील मान्सूनची शाखा रविवारपर्यंत (दि.9) ईशान्य भारतातील काही राज्यांत पोहचण्याची शक्‍यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.