बनावट दारू निर्मिती कारखान्यांवर छापा

राज्य उत्पादन शुल्कची फलटण तालुक्‍यात कारवाई : दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा – सातारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने फलटण तालुक्‍यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदा बनावट देशी- विदेशी दारूनिर्मिती कारखान्यांवर छापा घालून फोर्ड आयकॉन कंपनीच्या एक चारचाकी वाहनासह एकूण दोन लाख चार हजार 178 किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईमध्ये चार जणांना अटक करण्यात आली असून रज्जाक हिराबाई सय्यद (रा. मलवडी ता. फलटण) हा फरारी असून एकूण पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये आसिफ रज्जाक सय्यद (रा. मलवडी, ता. फलटण) याच्या ताब्यातून बनावट दारुनिर्मिती करीता लागणारे स्पिरीट, रिकाम्या देशी दारु सखू संत्राच्या व विदेशी दारू मॅकडॉल नं. 1 व्हिस्कीच्या बाटल्या, बुचे, इसेन्स, बुचे सील करण्यासाठी वापरण्यात येणारे एक हातमशीन, बनावट 180 मिलिलीटर व 90 मिलिलीटर क्षमतेच्या देशी दारू सखू संत्रा व बनावट विदेशी दारू मॅकडॉल नं. 1 व्हिस्की दारूचा साठा व फोर्ड आयकॉन कंपनीची एक चारचाकी वाहन जप्त केले.

मौजे वाखरी येथून संशयित बाबा मारुती जाधव याच्या ताब्यातून बनावट देशी दारु सखू संत्राचा रुपये तीन हजार 640 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विकास ईश्‍वर काकडे (रा. बिबी, ता. फलटण) याच्याकडून बनावट देशी दारू सखू संत्राचा रुपये एक हजार 352 किमतीचा तर राहुल श्रीकांत सरगर (रा. पवार गल्ली महतपुरा पेठ, मलटण) याच्या ताब्यातून विदेशी दारुचा रुपये चार हजार 170 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.