पुणे– जस क्रिकेट अकादमी पुणे आयोजित मान्सून प्रीमियर लीग 13 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत पुण्याच्या आर्यन्स क्रिकेट अकादमी व मुंबईच्या टायटन्स क्रिकेट अकादमी या संघांनी अनुक्रमे मुंबईच्या क्रिकेट मंत्राज व जस क्रिकेट अकादमी संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
धानोरी येथील जस क्रिकेट अकादमीच्या प्रकाश टिंगरे मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत आर्यन्स क्रिकेट अकादमी संघाने क्रिकेट मंत्राज संघाचा 5 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आर्यन्स क्रिकेट अकादमी संघाला 18.5 षटकांत 91 धावाच करता आल्या. हे आव्हान क्रिकेट मंत्राज संघ पेलू शकला नाही व त्यांचा डाव 20 षटकांत 7 बाद 86 धावाच करू शकला.
दुसऱ्या सामन्यात टायटन्स क्रिकेट अकादमी संघाने जस क्रिकेट अकादमी संघाचा 14 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना टायटन्स क्रिकेट अकादमीने 18.3 षटकांत 101 धावापर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना जस क्रिकेट अकादमी संघाला 20 षटकांत 7 बाद 87 धावाच करता आल्या.
संक्षिप्त धावफलक :
उपांत्य फेरी : 1) आर्यन्स क्रिकेट अकादमी : 18.5 षटकांत सर्वबाद 91 धावा. (शौनक शेवडे 32, अर्जुन गोडसे 18, परीन दळवी 2-20, जय भानुशाली 2-13, अनिरुद्ध नायर 2-10) वि. वि. क्रिकेट मंत्राज (मुंबई) : 20 षटकांत 7 बाद 86 धावा. (अनिरुद्ध नायर नाबाद 21, गांधार भानसे 16, हरिमन राखुडे 12, अद्वैत 2-7, अर्णव गोळे 1-21, शौर्य कांबळे 1-17). सामनावीर – शौनक शेवडे.
2) टायटन्स क्रिकेट अकादमी (मुंबई) : 18.3 षटकांत सर्वबाद 101 धावा. (आर्य काळे 30, आयुष जाधव 18, समिन किणी 16, प्रेम निंबाळकर 3-11, श्लोक कापसे 2-19, अर्पण धर 2-9, ओम खुडे 1-22) वि. वि. जस क्रिकेट अकादमी : 20 षटकांत 7 बाद 87 धावा. (प्रेम निंबाळकर नाबाद 35, श्लोक कापसे 15, ओम खुडे 14, निलय परांजपे 2-17, आरुष नाडगेरी 2-12, आयुष शेटे 1-15). सामनावीर – आर्य काळे.