लंडन – करोना महामारी पाठोपाठ जगातील 58 देशांमध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग वाढत आहे. या देशांमध्ये मंकीपॉक्सचे विषाणूचं संक्रमण झाले असून वाढता धोका लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) मंकीपॉक्स संसर्गाला जागतिक महामारी घोषीत करण्यातची शक्यता आहे. यासंदर्भात डब्ल्यूएचओने एक आपत्कालीन समितीची तातडीने बैठक बोलावली आहे.
जगभरात आतापर्यंत मंकीपॉक्स व्हायरसच्या 3 हजार 417 लोकांना संसर्ग झाला आहे. जागतिक आरोग्य समूहाने एका निवेदनात म्हटले आहे की, अनेक खंडांमध्ये मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे, हे थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, मंकीपॉक्सला महामारी म्हणून घोषित करण्यात येईल.याचा मूळ उद्देश जगभरातील देशांना मंकीपॉक्स विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे. कांजिण्यांच्या तुलनेत यासंबंधित मृत्यूचे प्रमाण खूपच कमी असले तरी, याचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना न केल्यास लाखो लोक मृत्यूमुखी होण्याची शक्यता आहेत. शिवाय अनेक लोक अंध आणि अपंग होतील, असेही संघटनेने म्हटले आहे.
जागतिक आरोग्य समूहाचे सह-संस्थापक यानिर बार-यम यांनी सांगितले की, मंकीपॉक्स साथीचा संसर्ग 2022 अखेरपर्यंत वाढण्याची वाट पाहण्यापेक्षा त्वरित कारवाई करून आपण याचा उद्रेक नियंत्रित करता येईल. अशा प्रकारे आपण परिस्थिती बिघडण्यापासून रोखू शकतो. याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेने ही मंकीपॉक्सला गांभीर्याने घेण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत अनेक दशकांपासून मंकीपॉक्सने लाखो जणांचा बळी घेतला आहे. या देशांमध्ये रोगाच्या एका साथीने संक्रमित झालेल्या 10 टक्के लोकांचा मृत्यू होतो.