मुंबई – चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी अष्टपैलू मोईन अली याच्या पायाला दुखापत झाली असून, त्याला किमान एक आठवडा आयपीएल स्पर्धेतील सामने खेळता येणार नाहीत. त्यामुळे चेन्नई संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
सरावादरम्यान मोईनच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला सोमवारी पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्याला मुकावे लागले होते. त्याच्या अनुपस्थितीत चेन्नईला पराभव पत्करावा लागला होता. मोईनच्या पायाला दुखापत झाली आहे. पायाला फ्रॅक्चर लावावे लागले नसले तरीही त्याला किमान एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.