Stock Market Opening : शेअर बाजार आज किंचित वधारत बाजार उघडताच लाल रंगात घसरला आहे. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीने थोडीशी घसरण होऊन चढ-उतारांसह व्यवहार सुरू झाले. बाजार उघडल्यानंतर दीड तासात सेन्सेक्समध्ये सुमारे 500 अंकांची आणि निफ्टीमध्ये 130 अंकांपेक्षा अधिकची घसरण दिसून आली.
शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, सकाळी 10:30 वाजता BSE सेन्सेक्स 483.54 अंकांनी किंवा 0.67 टक्क्यांनी घसरून 71,788 वर आला आहे. NSE चा निफ्टी 131.30 अंकांनी किंवा 0.60 टक्क्यांनी घसरून 21,610 वर आला आहे.
सेन्सेक्स-निफ्टीची इंट्राडेची नीचांकी पातळी
आज सकाळी सेन्सेक्स 658.2 अंकांनी घसरला आणि 71,613 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. NSE निफ्टीची आजची नीचांकी पातळी 21555 होती.
दरम्यान, BSE सेन्सेक्स 60.91 अंकांच्या वाढीसह 72,332.85 वर उघडला आणि काल तो 72,271.94 च्या पातळीवर बंद झाला. NSE चा निफ्टी 9.40 अंकांच्या किंचित वाढीसह 21,751.35 वर उघडला, तर सोमवारी तो 21,741.90 च्या पातळीवर बंद झाला होता.
देशांतर्गत शेअर बाजार का घसरला?
काल जागतिक बाजारातील अनेक शेअर बाजार बंद झाले होते त्यामुळे देशांतर्गत बाजाराला पाठिंबा नव्हता. आज जागतिक तेलाचा बेंचमार्क ब्रेंट क्रूड 1.60 टक्क्यांनी वाढून $78.27 प्रति बॅरल झाला आहे. त्यामुळे शेअर बाजारावरही नकारात्मक परिणाम दिसून येत आहे. भारतातील विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) सोमवारी 855.80 कोटी रुपयांचे समभाग विकले, ज्यामुळे शेअर बाजारात कमजोरी आली.
डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत
देशांतर्गत शेअर बाजारातील निगेटिव सेंटीमेंट आणि परदेशी बाजारात अमेरिकन चलनाची मजबूती यामुळे आज डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला. मंगळवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात रुपया 11 पैशांनी घसरून 83.32 वर आला.