नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीने शुक्रवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ गाणे शेअर करून कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. ‘मोहब्बत दिल में रहती है दुकान में नहीं’ असे नमूद करून राहुल गांधींच्या मोहब्बत की दुकान या संकल्पनेवर त्यांनी टीका केली आहे.
व्हिडिओमध्ये नमूद करण्यात आले आहे की कॉंग्रेसच्या दुकानांनी केवळ आणीबाणी, फाळणी आणि भारतातील लोकांना शिवीगाळ केली आहे. राहुल गांधी यांनी मणिपुरच्या विषयावरून मोदी सरकारवर संसदेत जोरदार हल्लाबोल केला होता. मोदी सरकारने मणिपुरातील लोकांना एकमेकांच्या विरोधात लढवले आहे, त्यांनी मणिपुरात भारत मातेची हत्या केली आहे अशी टीका केली होती.
मणिपुर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मणिपुरात राहुल गांधींनी भेट दिली होती. व तेथील जनतेच्या मनात आशेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला असे दावे कॉंग्रेस समर्थकांकडून सातत्याने केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने आज त्यांच्या मोहब्बतकी दुकान या संकल्पनेवरच हल्ला केला.