मोदींचा बायोपिक निवडणूकीच्या एक दिवस अगोदरच रिलीज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकच्या रिलीजची तारीख निश्‍चित झाली आहे. सिनेमामध्ये मोदींचा रोल करणाऱ्य विवेक ओबेरॉयनेच याबाबतची माहिती दिली. या सिनेमाच्या रिलीजला बऱ्याच राजकीय पक्षांकडून विरोध व्हायला लागला होता. दोन वेगवेगळ्या हायकोर्टांमध्ये यासाठी याचिकाही दाखल झाल्या. पण कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. त्यामुळे निर्मात्यांनी रिलीज बेमुदत पुढे ढकलायचा निर्णय घेतला होता.

आता सर्व अडचणींवर मात केल्यावर “पीएम नरेंद्र मोदी’ 11 एप्रिलला रिलीज करण्यात येणार आहे. विवेक ओबेरॉयने सोशल मिडीयावरून ही माहिती दिली आहे. लोकसभेच्या निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिललाच होणार आहे. विवेक ओबेरॉयने या सिनेमाचे नवीन पोस्टर देखील शेअर केले आहे. त्यामध्ये या नवीन रिलीज डेटचा उल्लेख आहे.

सर्व फॅन आणि ज्युडिशियरीला पाठिंबा दिल्याबद्दल त्याने धन्यवादही दिले आहेत. हा सिनेमा सर्वांना प्रेरणादायी ठरेल, अशी आशाही विवेक ओबेरॉयने व्यक्‍त केली आहे. हा सिनेमा बघूनच लोकांनी मतदानाला जावे, असे तर विवेक ओबेरॉयला सुचवायचे नसेल ना.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.