सलमानचे एकापाठोपाठ एक सात सिनेमे

सलमान सध्या बॉलिवूडमधील सर्वात बिझी ऍक्‍टर आहे. त्याच्या “दबंग 3′ चे शुटिंग सुरू झाले आहे. याशिवाय “भारत’चे शुटिंगही आता संपले आहे. पुढील वर्षभराच्या कालावधीत त्याचे एकापाठोपाठ एक सात सिनेमे रिलीज होणार आहेत. या सिनेमांची घोषणा त्याने नुकतीच केली आहे. “भारत’ आणि “दबंग 3′ नंतर “इन्शाअल्लाह’ मध्ये सलमान 20 वर्षांनंतर संजय लिला भन्साळीबरोबर काम करणार आहे. त्यानंतर दक्षिण कोरियाच्या सिनेमाचा रिमेक असलेल्या”वेटरन’ मध्ये सलमान काम करणार आहे. अतुल अग्निहोत्रीने या सिनेमाचे हक्क विकत घेतले आहेत.

“एक था टायगर’चा सिक्‍वेल “टायगर जिंदा है’ हे दोन्ही सिनेमे बॉक्‍स ऑफिसवर हिट झाले होते. आता त्याच फ्रॅंचाइजीमधील तिसऱ्या सिनेमाची तयारीही सुरू झाली आहे. “प्रेम रतन धन पायो’नंतर सलमानने सूरज बडजात्यांच्या आणखी एका सिनेमात काम करायचे मान्य केले आहे. हा एक फॅमिली ड्रामा असणार आहे. सलमानच्या 2014 मधील “किक’चा सिक्‍वेल पुढच्यावर्षी करणार असल्याची घोषणा साजिद नाडियादवालाने गेल्या वर्षी केली होती. “किक -2’मध्ये सलमानबरोबर जॅकलीन फर्नांडिस असणार आहे. एवढ्या सिनेमांचे शेड्युल सांभाळायचे म्हणजे सलमान खूपच बिझी असणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.