मोदी, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, फक्त गुजरातचे नव्हे – कमल नाथ

नवी दिल्ली – देशातील अनेक भागांमध्ये सध्या वादळी पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. विशेषतः राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजराला पावसाने अगदी झोडपून टाकले आहे. जोरदार वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर ३५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या विविध भागातील जोरदार वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे दुःख व्यक्त केले असून गुजरातमधील मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटूंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतर्फे प्रत्येकी दोन लाख रुपये अनुदान घोषित केले आहे. या ट्विटमध्ये फक्त गुजरात राज्याचे नाव नमूद केल्यामुळे मध्य प्रदेश के मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पंतप्रधान मोदीवर ट्विटद्वारे टीका केली.

याबाबत पहिल्या ट्विटमध्ये पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, ‘अधिकारी परिस्थितीकडे लक्ष ठेवत आहेत. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतर्फे गुजरातच्या वेगवेगळ्या भागातील अवकाळी पाऊस जीव गमावलेल्या कुटूंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये अनुदान घोषित केले आहे.” या ट्विटमध्ये फक्त गुजरात राज्याचे नाव नमूद केल्यामुळे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पंतप्रधान मोदीवर ट्विटद्वारे  टीका केली की, ” मोदीजी, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, फक्त गुजरातचे नाही, अवकाळी पावसामुळे मध्य प्रदेशमध्ये  १० नागरिकांचा मृत्यू झाला आहे मात्र तुमची भावना केवळ गुजरातपर्यंतच मर्यादित आहे? मध्यप्रदेशमध्ये तुमची सरकार नसली तरी लोक इथे देखील राहतात. ‘

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.