पुणे – वीजजोडणीचा अर्ज ऑनलाइनच करावा

पुणे – औद्योगिक ग्राहकांसाठी राज्यभरात वीज मीटरचा पुरवठा मुबलक करण्यात आला असून नवीन औद्योगिक ग्राहकांनी वीजजोडणीचा अर्ज ऑनलाइनच करावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केले.

पुणे व कोंकण प्रादेशिक विभागातील औद्योगिक ग्राहकांसोबत प्रकाशगड मुख्यालयातून व्हिडीओ कॉन्फरेन्सद्वारे कुमार यांनी थेट संवाद साधला. औद्योगिक ग्राहक संघटना व त्यांचे प्रतिनिधी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने मोबाईल व्हॅन, मीटर्स, फिडर सेपरेशन करणे, पायाभूत सुविधांची उभारणी इत्यादी विषयांबाबत चर्चा करून महावितरणच्या सेवेत आणखी सुधारणा करण्यासाठी त्यांनी सुचना केल्या. तसेच एमआयडीसी, महापारेषण कंपनीच्या अखत्यारितील मागण्यांबाबत विशेष प्रस्ताव सादर करणे, त्यांच्यासोबत समन्वय बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत सुचविण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.