मोदी, शहांच्या होमपिचवर आजवरचे उच्चांकी मतदान 

अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे होमपिच असणाऱ्या गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीतील आजवरचे उच्चांकी मतदान नोंदले गेले आहे. त्या राज्यात तब्बल 64.11 टक्के मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. गुजरातमध्ये लोकसभेच्या एकूण 26 जागा आहेत. त्या सर्व जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. त्या राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी 1967 साली सर्वांधिक मतदान (63.77 टक्के) झाले. तो विक्रम यंदा मोडला गेला.

मागील वेळी मोदी लाट असताना गुजरातमध्ये 63.60 टक्के इतके मतदान झाले होते. दरम्यान, अधिक मतदान आमच्यासाठी अनुकूल ठरेल, असा विश्‍वास भाजपकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर, मागील वेळी गुजरातमध्ये खातेही खोलू न शकणाऱ्या कॉंग्रेसने यावेळी चांगली कामगिरी होण्याचा दावा केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.