मुंबई – आगामी महानगर पालिकांच्या दृष्टीने भाजपने मुंबईवर चांगलेच लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे पंतप्रधानांसह इतर केंद्रीय मंत्र्यांचे देखील मुंबईक दौरे वाढणार आहेत. अशात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मोदी शहांच्या दौऱ्यावर टीका केली आहे. मोदी शहांनी सतत मुंबईत येण्यापेक्षा मुंबईतच एखादा टू बीएचके फ्लॅट घेऊन रहावे असा टोला अंधारे यांनी लगावला आहे.
पाटण मतदार संघात अंधारे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी आणि शहांनी शिवसेनेची धास्ती घेतली आहे त्यामुळे त्यांचे मुंबई दौरे वाढले आहेत. त्यांनी सतत दौरे करण्यापेक्षा मुंबईतच टु बीएचके फ्लॅट घ्यावा असा सल्ला सुषमा अंधारे यांनी दिला आहे.
शंभूराज देसाई हे सूड भावनेने राजकारण करत आहेत. यंदा देसाई यांना गुलाल न मिळू देण्याचा कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आहे असं देखील यावेळी अंधारे म्हणाल्या. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार आले. त्यानंतर सुषमा अंधारे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला. तेव्हापासून अंधारे या शिवसेनेसाठी राज्यभर दौरा करताहेत. या दौऱ्यादरम्यान भाजपसह शिंदे गटातील अनेक नेत्यांवर त्या टीका करताना दिसून येतात.