मुंबई – ‘गौतमी पाटील’ हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलच चर्चेत आहे. त्यासोबत चर्चेत आहेत गौतमी पाटीलने केलेल्या डान्सचे व्हिडीओ आणि याच व्हिडीओमुळे आज गौतमी पाटील सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. डान्स दरम्यान केलेलं अंगविक्षेप यामुळे गौतमीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, नेटकरी देखील तिच्या या व्हिडिओवर जोरदार कमेंटचा वर्षाव करत असतात.
दरम्यान, आपल्या लावणीमुळे धुमाकूळ घालत संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाल्याचं दिसून आलं आहे. नुकतंच सोलापूरच्या माढ्यातील मोडनिंबमध्ये गौतमीचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली असून पोलीस बंदोबस्तासह बाऊन्सर सुद्धा तैनात होते. मात्र, हुल्लडबाजी करणाऱ्या गौतमीच्या अनेक चाहत्यांना यावेळी काठीचा प्रसाद खावा लागला.
तर दुसरीकडे राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी देखील अलिकडेच अशिल डान्स कार्यक्रमांच्या आयोजनावरून पक्षातील पदाधिकाऱ्यांना खडसावलं होतं. पदाधिकाऱ्यांनी असे कार्यक्रम आयोजित करू नयेत अशी सूचनाही अजित पवारांनी केली होती. त्यानंतर गौतमी पाटीलने सपशेल शरणागती पत्करल्याचे दिसून आले होते.
दरम्यान, आता याच मुद्यावर गौतमी पाटीलने आपली भावना व्यक्त केली आहे. यावेळी गौतमी माध्यमांशी बोलत होती. गौतमी पाटील म्हणाली, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानामित्त असलेल्या कार्यक्रमाला मला बोलवल्याचा फार आनंद होतोय. मी खूप खूश आहे. मात्र, अजित दादा खूप मोठे देवमाणूस आहेत. माझे म्हणणे मांडण्यासाठी अजितदादांना कसं भेटायचं. त्यांना भेटण्याचं सध्या तरी डोक्यात नाही. मात्र येत्या काही दिवसांत भेटणार असल्याचं गौतमी पाटीलने यावेळी सांगितलं आहे.