५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाचा मोदींकडून पुनरुच्चार

रूस – भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर बनविण्याच्या उद्दिष्टाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे. ते रशियामध्ये इस्टर्न इकॉनोमिक फोरम (EEF)च्या कार्यंक्रमात बोलत होते.

नरेंद्र मोदी म्हणाले कि, भारताला रशियाबरोबर पुढे जायचे आहे. भारतात आम्ही सबका साथ, सबका विकास आणि सर्वांच्या विश्वासासोबत पुढे जात आहोत. भारत २०२४ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने प्रवास करत आहे. भारत आणि रशिया एकत्र आल्यास विकासाची गती 1 + 1 = 11 करण्याची संधी आहे. अलीकडे आमच्या देशातील अनेक नेते येथे आले आणि त्यांनी बर्‍याच विषयांवर चर्चा केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट कसे गाठणार असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे. आर्थिक मंदीच्या चिंतेने भांडवली बाजारातील घसरण कमालीची तीव्र झाली आहे. तसेच खासगी उद्योगक्षेत्रातील मंदीमुळे रोजगार कपातीची कुऱ्हाड कर्मचाऱ्यांवर कोसळली आहे. आर्थिक विकासाच्या दृष्टीनं प्रगती साधण्यासाठी २३ ऑगस्ट रोजी केलेल्या तात्पुरत्या घोषणांमुळं झालेली मलमपट्टी वरवरची ठरल्यानं अर्थमंत्र्यांनी राष्ट्रीय बँकांचं एकत्रीकरण व त्यातील गव्हर्नन्स बद्दल काही सूचना वजा घोषणा केल्या व सध्याची आपली २.६ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था लवकरच ५ ट्रिलियन डॉलरकडं कशी सरकतीय हे पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, अनेकदा सरकारमध्येच याबाबत मतभेद असल्याचे दिसून येते. त्यामुळे अर्थव्यवस्थेबाबत येत्या काळात फार आशादायक असे काही घडण्याची शक्‍यता धूसरच दिसते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here