मुंबई – बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर यांच्या आगामी “दोस्ताना 2’मधील जोडीचा सस्पेंस अखेर संपला आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर यांची नावे फायनल करण्यात आली होती तर आता या चित्रपटतील तिसऱ्या ऍक्टरचा शोधही निश्चित मानली करण्यात आला आहे. “दोस्ताना 2’मधील आघाडीच्या कलाकारांबाबत काही दिवसांपासून अनेक जणांची नावे चर्चेत आली होती. पण अखेर या सर्व अफवांना पूर्ण विराम मिळाला आहे.
या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर या सोबतच या करणने एका नवीन चेहऱ्याला या चित्रपटात लाँच केले आहे. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. करण जोहरने लिहिले आहे की, ‘एक नव्या चेहरा लॉन्च करताना धर्मा प्रोडक्शनला आनंद होत आहे. ‘लक्ष्य’ आमच्या दोस्ताना 2 मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. आम्हाला आशा आहे की आमच्यासोबत तो एक सॉलिड जर्नी सुरु करेल. लक्ष्यचे स्वागत करा आणि त्याला तुमचं प्रेम आणि आर्शिवाद द्या.’
दरम्यान, या चित्रपटातून युवा जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे, असे करण याने सांगितले. तत्पूर्वी, “दोस्ताना’मध्ये जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन आणि प्रियांका चोप्रा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटातील जॉन आणि अभिषेकच्या जोडीला खूपच पसंती मिळाली होती.