मानुषीच्या बॉलीवूड पदार्पणाला मुहूर्त मिळाला

2017 सालची “मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर बॉलीवूडमध्ये कधी पदार्पण करणार याची वर्षभरापासून वाट बघितली जात होती. आता मानुषीच्या बॉलीवूड पदार्पणाला मुहूर्त मिळाला आहे. डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या दिग्दर्शनाखाली पृथ्वीराज चौहान यांच्या बायोपिकमध्ये मानुषी संयोगिताचा रोल साकारणार आहे. पृथ्वीराज चौहानांच्या रोलमध्ये अक्षयकुमारची निश्‍चिती झाली आहे.

मानुषीच्या निवडीची घोषणा अद्याप अधिकृतपणे करण्यात आलेली नाही. द्विवेदी यांनी या रोलसाठी तरुण आणि फ्रेश चेहऱ्याची नायिका घ्यायचे ठरवले होते. पृथ्वीराज चौहान यांच्या रोलला साजेशी संयोगिता त्यांना हवी होती. त्यानुसार गेल्या आठवड्यात यशराज स्टुडिओमध्ये मानुषीची लूक टेस्ट झाली. याचदरम्यान फराह खानच्या “सत्ते पे सत्ता’च्या रिमेकमध्ये ही मानुषीची निवड झाल्याचे समजते आहे.

2017 साली “मिस वर्ल्ड’ झालेल्या मानुषी छिल्लरकडे तेव्हा अनेक सिनेमे आले होते. मात्र, वर्षभर तिला “मिस वर्ल्ड’च्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचे होते. त्यानंतर एक वर्ष तिने डान्स आणि ऍक्‍टिंग वर्कशॉप केले. याचदरम्यान मानुषीला सलमान खान बॉलीवूडमध्ये लॉंच करणार असेही समजले होते. पण पुढे त्याचे काहीच झाले नाही. संयोगिताचा रोल मिळण्याची शक्‍यता लक्षात आल्यावर मानुषीने अनेक ऐतिहासिक पुस्तकेही वाचली.

डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्यासारख्या प्रतिभावान दिग्दर्शकाबरोबर काम करायचे म्हणजे आपला “होम वर्क’ पूर्ण असायला पाहिजे. याची तिला पूर्ण कल्पना आहे. मसाला सिनेमातून पदार्पण करण्यापेक्षा ऐतिहासिक विषयावरील सिनेमांमधून बॉलीवूड पदार्पण करायला मिळणे मानुषीसाठी खूप भाग्याचे आहे. आता संयोगिताच्या रोलमध्ये स्क्रीनवर दिसणारी मानुषी प्रेक्षकांना काही दिवसात बघायला मिळेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)