चित्रकुट – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 296 किमी लांबीच्या बुंदेलखंड एक्स्प्रेस वे च्या कामाचे आज चित्रकुट येथे उदघाटन केले. या महामार्ग उभारणीला 14849 कोटी रूपये खर्च येणार आहे. हा मार्ग चित्रकुट, बांदा, हामीरपुर, व जलांऊ या जिल्ह्यांना जोडणार आहे. उत्तरप्रदेशात जो संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर उभारला जाणार आहे त्याला हा एक्स्प्रेस वे पुरक असणार आहे.
या महामार्गामुळे बुंदेलखंड देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला जोडले जाणार आहे. हा एक्स्प्रेस वे पुढे आग्रा-लखनौ एक्स्पेस वे आणि यमुना एक्सप्रेस वे ला जोडला जाणार आहे. या महामार्गामुळे बुंदेलखंडाचा विकास गतीमान होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.