कॉंग्रेसने लष्कराला असलेले कायद्याचे संरक्षण काढून घेण्याचे आश्वासन दिलेले नाही
नवी दिल्ली – कॉंग्रेस सत्तेवर आल्यास लष्करी दलांना संरक्षण देणारा अफस्पा कायदा हा पक्ष काढून टाकेल असा अप्रप्रचार पंतप्रधान मोदींनी सुरू केला आहे. त्यात जराही तथ्य नाही. उलट मोदींनीच त्रिपुरा, मेघालय आणि अरूणाचल प्रदेशच्या तीन जिल्ह्यांतून लष्कराला विशेषाधिकार देणारा हा कायदा पुर्णपणे रद्द केला आहे. त्याचा खुलासा मोदींनी केला पाहिजे असे जाहीर आव्हान ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी दिले आहे.
कॉंग्रेसने जाहीरनाम्यात लष्कराला संरक्षण देणारा कायदा काढून टाकण्याचे आश्वासन दिले आहे असे मोदी सर्रास खोटे, सांगत आहेत. आम्ही एखाद्या व्यक्तीला गायब करणे, बलात्कार आणि छळवणूक अशा स्वरूपाची तक्रार आली तरच लष्कराला या कायद्याचा आधार घेता येणार नाही संबंधीत लष्करी अधिकाऱ्याला किंवा जवानांना त्या तक्रारीविषयी चौकशीला सामोरे जावे लागेल एवढेच आम्ही या जाहीरनाम्यात म्हटले आहे. लष्कराला अफस्पा कायद्याने देण्यात आलेले संरक्षण काढून टाकू असे कॉंग्रेसने म्हटलेलेच नाही असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे. उलट मोदी यांनीच त्रिपुरा, मेघालय, आणि अरूणाचल प्रदेशच्या तीन जिल्ह्यांमधून या कायद्याचे लष्कराला असलेले संरक्षण काढून घेतले आहे. त्यांनी हे का केले याचे उत्तर आता दिले पाहिजे असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठी दहशतवाद्यांना पाठबळ देणारी ही कृती कॉंग्रेस करीत असल्याचा दावा मोदींकडून सातत्याने केला जात आहे त्यावर चिदंबरम यांनी हा खुलासा करीत त्यांच्यावर पलटवार केला आहे.
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय