P Chidambaram on BJP : आयकर विभागाची काँग्रेसला १३५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याची नोटीस, हा देशातील सर्व राजकीय पक्षांना आणि जनतेलाही, भाजपने दिलेला इशारा आहे असे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काँग्रेसला शुक्रवारी प्राप्तिकर विभागाकडून नव्या नोटिसा मिळाल्या आणि अजून त्यात त्यांना आणखी १८२३ कोटी रुपये भरण्यास सांगितले गेले आहे. चिदंबरम यांनी म्हटले आहे की भाजपने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून ८२५० कोटी रुपये मिळवले आहेत. | P Chidambaram on BJP
तरीही ते कॉंग्रेसला दंड ठोठावत आहेत याचा अर्थ भाजप सर्वच राजकीय पक्षांना नष्ट करू पहात आहे हा यातला महत्वाचा इशारा आहे, तो सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे. त्यांना यादेशात एक देश आणि केवळ एकच पक्ष हे तत्व अंमलात आणायचे आहे असा आरोपही चिदंबरम यांनी यावेळी केला. | P Chidambaram on BJP
काँग्रेसपाठोपाठ या पक्षालाही आयकर नोटीस
कॉंग्रेस पाठोपाठ आता कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियालाही आयकर विभागाकडून नोटीस प्राप्त झाली आहे, ज्यामध्ये कर रिटर्न भरताना जुने पॅन कार्ड वापरल्याबद्दल त्यांना ११ कोटी रुपयांचे “देय” भरण्यास सांगितले आहे. | P Chidambaram on BJP