हुमा कुरेशीच्या “लीला ‘ या वेबसिरीजचे शुटिंग पूर्ण

हुमा कुरेशीने अलिकडेच “लीला’ या वेबसिरीजचे शुटिंग पूर्ण केले आहे. “लीला’चे अखेरचे शेड्युल पूर्ण केल्यावर हुमा कुरेशीने इन्स्टाग्रामवर एक भावपूर्ण पोस्ट टाकली आहे. अशा वेबसिरीजमध्ये सुंदर व्यक्तिरेखा मिळाल्याबद्दल तिने स्वतःला भाग्यवान म्हटले आहे. तसेच या कॅरेक्‍टरच्या रोलसाठी आपल्याला संधी दिल्याबद्दल तिने निर्मात्यांचे आभारही मानले आहेत. “लीला’ ही वेबसिरीज प्रयाग अकबर यांच्या पुस्तकावर आधारीत आहे. या वेबसिरीजमध्ये हुमा कुरेशी शालिनी नावाची व्यक्तिरेखा साकारते आहे. तिच्या बेपत्ता झालेल्या मुलीच्या शोधासाठी ती जंग जंग पछाडते अशी या वेबसिरीजची मध्यवर्ती कथा आहे. हुमा कुरेशी प्रथमच एका आईच्या रोलमध्ये दिसणार आहे. “लीला’ ही वेबसिरीज 6 भागांमध्ये असून त्यामध्ये दीपा मेहता, शंकर रमण, पवन कुमार यांनी दिग्द्रशित केले आहे. हुमाने प्रिया श्रीधरन आणि वसीम खान हे या वेबसिरीजच्या निर्मात्यांचेही आभार मानले आहेत. “लीला’चे ट्रेलर लवकरच लॉंच होणार आहे. ही वेबसिरीज 14 जूनला रिलीज होणार आहे. सध्या त्याची वाट बघण्यापेक्षा हुमाकडे वेगळे विशेष काम काहीच नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.