नवी दिल्ली – मोदी सरकारने पेगॅसस हे स्पायवेअर खरेदी करून देशातील अनेकांची हेरगिरी केल्याचे उघड झाल्यानंतर ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी मोदी सरकारला चांगलाच टोमणा मारला आहे. त्यांनी म्हटले आहे की मोदी सरकारने 2 अब्ज डॉलर्स खर्चुन पेगॅसस खरेदी केले आहे, आता सन 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना 4 अब्ज डॉलर्स खर्च करून आणखीही काही हेरगिरी करणारी साधने खरेदी करता येतील.
न्युयॉर्क टाईम्सने मोदी सरकार विषयी हा गौप्यस्फोट केल्यानंतर केंद्रीय मंत्री व माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह यांनी न्युयॉर्क टाईम्सचा उल्लेख सुपारी मिडीया असा केला होता. त्यावर प्रतिक्रीया देताना चिदंबरम यांनी म्हटले आहे की, दोन वृत्तपत्रांनी वॉटरगेट प्रकरण आणि पेंटॅगॉन पेपर्सचा घोटाळा प्रकरणे बाहेर काढली त्याचा इतिहास व्ही. के. सिंह यांनी वाचला पाहिजे. जर त्यांनी तो इतिहास वाचला नसेल तर त्यांनी आता सिनेमे पाहणे सुरू करावे. पंतप्रधानाच्या वक्तव्यावचीही त्यांनी दुसऱ्या एका ट्विटर संदेशात त्यांनी जोरदार खिल्ली उडवली आहे.
चिदंबरम यांनी म्हटले आहे की, भारत आणि इस्त्रायल यांच्या संबंधात नवीन उद्दीष्ठे निश्चीत करण्यासाठीची सध्याची ही चांगली वेळ आहे असे मोदींनी काल म्हटले आहे, हे खरे आहे त्यामुळे हीच चांगली वेळ आहे की आता त्यांनी इस्त्रायलकडे पेगॅसस स्पायवेअरची पुढची आवृत्ती तयार झाली आहे काय अशी त्यांच्याकडे विचारणा करून ती खरेदी केली पाहिजे.