लाहोर : पाकिस्तानात असणाऱ्या नानकाना गुरूद्वारावर शुक्रवारी (दि,3) शेकडो मुस्लिमांच्या जमावाने हल्ला चढवला. जोरदार दगडफेक केली. या गुरूद्वारातच गुरू नानक देवजी यांचा जन्म झाला अशी स्थानिक शिख धर्मीयांची श्रध्दा आहे.
एनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एका स्थानिक युवकाने जगजित कौर या युवतीचे अपहरण केले. तिचे वडील या गुरूद्वाराचे पाठी आहेत. तिचे अपहरण महंमद हसन या तरूणाने केले. त्या विरोधात तिच्या भावाने पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्या घटनेचा राग मनात धरून हसन याच्या भावाने जमाव गोळा केला. त्यांनी गुरूद्वाराला घेराव घातला आणि तो उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली.
LIVE Footage from Nankana Sahib where an angry Muslim mob is outside Gurdwara Sahib and raising anti-Sikh slogans
I urge @ImranKhanPTI Ji to take immediate action on such communal incidents that are increasing the insecurity in the minds of Sikhs of Pak@thetribunechd @PTI_News pic.twitter.com/IlxxBjhpO2
— Manjinder S Sirsa (@mssirsa) January 3, 2020
कडक कारवाई करा : परराष्ट्र मंत्रालय
पाकिस्तान सरकार या गुरूद्वाराचे संरक्षण आणि पावित्र्य जपण्यासाठी पाकिस्तान सरकारने आदेश द्यावेत. या पवित्र वास्तूवर हल्ल्याचा आणि ती उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नाचा भारत सरकार तीव्र निषेध करत आहे. शिख समाजाची सुरक्षा आणि त्यांच्या हितसंबंधाची जोपासना करण्यासाठी पाक सरकार पावले उचलेल, अशी अपेक्षा परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने व्यक्त केली.
तत्पुर्वी अकाली दलाचे आमदार मनजिंदरसिंग सिरसा यांनी एक व्हिडिओ शेअर केला. त्यात जमाव शिखविरोधी घोषणा देत असल्याचे दिसत आहे.