भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण
मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या सुरेंद्र गडलिंग यांना न्यायालयाने तातडीने दिलासा देण्यास नकार दिला. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी गडलिंग यांच्या जामीन अर्जावर दोन आठवड्यानंतर सुनावणी घेण्याचे निश्चित केले.
भीमा कोरेगाव येथील 31 डिसेंबर 2017 आणि 1 जानेवारी 2018 दरम्यान झालेल्या हिंसाचाराला जबाबदार ठरवून पुणे पोलिसांनी विविध गुन्ह्याअंतर्गत 162 जणांविरोधात 58 गुन्हे दाखल करून सुरेंद्र गडलिंग यांना अटक केली.
त्यानंतर त्यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल केले. जामीन मिळावा म्हणून जिल्हा न्यायालयात धाव घेणाऱ्या गाडलिंग यांच्या जामिन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने अर्जाची सुनावणी दोन आठवडे तहकूब ठेवली.