मुंबई – काल झालेल्या दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह यावेळी ठाकरेंच्या निशाण्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील होते. तसेच शिवसेनेवर हिंदुत्व सोडण्याच्या मुद्दयांवर केलेल्या आरोपांना देखील यावेळी उद्धव ठाकरेंनी जोरदार उत्तर दिल. उद्धव ठाकरेंच्या भाषणावर आता राज ठाकरेंच्या मनसेची प्रतिक्रिया समोर आली आहे.
उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय भाष्य करणार यावर विरोधकांनी भाषणापूर्वीच कयास लावले होते.परंतु यावेळी ठाकरेंनी केवळ शिंदे गटावर निशाणा न साधता देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मोहन भागवत यांच्यावर देखील टीका केल्याचे दिसून आले. यावेळीही उद्धव ठाकरेंनी अमित शहांना पाकव्याप्त जमीन घेऊन दाखवा असे आव्हान दिले. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एका वाक्यात कालच्या ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे.
नुसतीच ‘उणी’ ‘धुणी’ ‘नळ’ आणि ‘भांडण’; विचार ही नाही आणि सोनं ही नाही अशा आशयाचे ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाकरेंच्या आरोपांना आपल्या भाषणातून उत्तर देत जोरदार हल्लाबोल केला.
नुसतीच “उणी”धुणी” “नळ”आणि”भांडण”विचार ही नाही आणि सोन ही नाही.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 5, 2022