मुंबई – बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या भाषणाला सुरूवात केली त्यावेळी त्यांनी तेथे उपस्थित गर्दीचा उल्लेख केला मात्र त्यांच्या भाषणा दरम्यान सभेसाठी जमलेले कार्यकर्ते उठून जात असल्याचं दिसून आले. सध्या याचे व्हिडिओ सोशलवर मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
एकनाथ शिंदे म्हणत आहेत ‘तुमच्या हक्काचा माणूस मंत्रालयात बसला आहे’ आणि भाड्याने आणलेले लोक सभेतून उठून चालले आहेत. pic.twitter.com/3klPBXRwBw
— Praveen Gavit (@praveengavit11) October 5, 2022
एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना अनेकजण घरी निघाल्याचं दिसून आलं. लोक कालपासून प्रवासात आहेत. सत्तेच्या हव्यासापोटी हिंदुत्वाच्या विचाराला उद्धव ठाकरेंनी मूठमाती दिली. बाळासाहेबांनी ज्यांच्यावर टीका केली, त्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली, त्यामुळं शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधत आपल्या भाषणाला सुरूवात केली आहे.
दरम्यान, बीकेसीवरील दसरा मेळाव्यासाठी लोक दुपारपासून जमले होते. काही जण काल पासून प्रवासात होते. मात्र, सभा लांबत चालल्यानं लोक उठून गेले. काही जण बीकेसीच्या बाहेर थांबून उभे राहून सभा ऐकत होते ते देखील सभा लांबत असल्यानं निघून गेले. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशलवर चांगलेच व्हायरल होत आहे.