पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाढवा मेळाव्यात मशिदींसमोरील भोंग्याच्या समोर स्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश पक्ष कार्यकर्त्यांना दिले आहेत. या आदेशावरून पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये असलेले वाद चव्हाट्यावर आले आहेत. यावरून नगरसेवक वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान पुण्याच्या मनसे शहर अध्यक्षपदी साईनाथ बाबर यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात मनसेकडून अधिकृत घोषण करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर अध्यक्षपदी आज नगरसेवक साईनाथ बाबर यांची मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यानी नियुक्ती केली आहे. राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेची जोरदार चर्चा होती. त्यामुळे राज ठाकरे हे वसंत मोरे यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात होते. हा अंदाज अखेर खरा ठरला आहे.
दरम्यान, वसंत मोरे यांनी बाबर यांचे अभिनंदन केले आहे. “आरे मी तर कधी पासूनच तुझा मावळा आहे ” कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड खुप खुप अभिनंदन साई. अशी पोस्ट फेसबुकवर मोरे यांनी केली आहे.