मुंबई – चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या RRR चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आहेत. या चित्रपटाच्या कलेक्शनने 900 कोटींचा आकडा पार केला आहे आणि अद्यापही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. या चित्रपटासाठी यापूर्वी काही बॉलिवूड स्टार्सना अप्रोच करण्यात आले होते पण काही कारणांमुळे त्यांनी RRR मध्ये काम करण्यास नकार दिला होता.
अभिनेत्री परिणिती चोप्राला राजामौली यांनी राम चरणच्या सीतेच्या भूमिकेची अभिनेत्रीला ऑफर देण्यात आली होती. परंतु परिणिती दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यक्त असल्यामुळे तारखां जुळून आल्या नाहीत त्यामुळे तिने RRR मधील भूमिका नाकारली. परिणीतीने नकार दिल्यानंतर ही भूमिका आलिया भट्टला देण्यात आली आणि तिने यासाठी होकार दिला.
या चित्रपटात ज्युनियर एनटीआरसोबत श्रद्धा कपूर दिसणार असल्याची चर्चा होती पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीचे शेड्युल खूप व्यस्त असल्याने तिने ही भूमिका करायलाही नकार दिला. श्रद्धा व्यतिरिक्त, कतरिना कैफची धाकटी बहीण इसाबेल कैफ हिला ज्युनियर एनटीआर या चित्रपटात तिच्या मैत्रिणीच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, परंतु तिने ती नाकारली.