बंगळुरू – कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे आमदार वीरूपक्षप्पा यांच्या चिरंजीवाने एका साबण बनवणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींकडून परवान्यासाठी लाच घेतली. त्यावेळी त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला असता त्याच्या घरात नोटांच्या थप्प्या पाहून तपास अधिकारी चक्राऊन गेले.
Cash worth ₹8 crore has been recovered from the house of a BJP MLA in Karnataka.
His son was caught accepting a bribe of ₹40 lakh.#40PercentSarkara EXPOSED yet again!
— Ruchira Chaturvedi (@RuchiraC) March 3, 2023
या नोटांची मोजदाद केल्यानंतर ही रक्कम सहा कोटींपेक्षा अधिक भरली आहे. एस वीरूपक्षप्पा हे दावणगिरी जिल्ह्यातील चन्नागीरीचे आमदार आहेत. ते कर्नाटक सोप्स अँड डिर्जंट लि चे अध्यक्ष आहेत. त्यांच्या मुलाने लाच घेतल्याचे प्रकरण लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आज हे छापे लोकायुक्त यंत्रणेकडून घालण्यात आले. तथापि या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही असे या आमदारांनी म्हटले आहे.