मुंबई – एक लाख रुपये लाच प्रकरणी मुंबईतील मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली. सुजाता पाटील यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार एसीबीने कार्यालयात सापळा रचून डीसीपी सुजाता पाटील यांना 40 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली.
दरम्यान, याआधीही सुजाता पाटील चर्चेत आल्या होत्या. बदली करताना माझा विचारच करण्यात आला नाही, त्यातच मी कर्जबाजारी झाले असून माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे माझ्यासमोर आत्महत्या करणे किंवा राजीनामा देणे, हेच पर्याय असल्याचे पत्र हिंगोलीच्या पोलिस उपअधीक्षकपदी असताना सुजाता पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. त्यामुळे राज्यातील पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती.