आमदार खेडचे, राहतात पुण्याला!

पाईट येथे दिलीप मोहिते यांची आमदार गोरेंवर टीका

पाईट- आमदार खेड तालुक्‍याचे आणि हे राहतात पुण्याला. त्यामुळे तालुक्‍याशी प्रतारणा करणारे हे पार्सल पुण्याला पाठवा, असे आवाहन माजी आमदार दिलीप मोहिते यांनी मतदारांना केले.

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांचे प्रचारार्थ पाईट येथे सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अरुण चांभारे, अनिल राक्षे, बाळशेठ ठाकूर, कैलास सांडभोर, सुनंदा सुकाळे, मंदा शिंदे, सुरेश शिंदे, नवनाथ होले, चंद्रकांत इंगवले, अशोक राक्षे, विनायक घुमटकर, धैर्यशील पानसरे, सुभाष होले, रमेश राळे, सतीश राक्षे, कैलास लिंभोरे, रामदास माटे, विठ्ठल वनघरे, सुरेखा मोहिते, वंदना सातपुते, संदीप सांडभोर, संध्या जाधव, जया मोरे आदींसह अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

दिलीप मोहिते म्हणले की, गुंडगिरी संपवायची मग काय पाच वर्षे झोपा काढीत होते? सत्तेत असताना पाच वर्षे युतीचे जमत नव्हते व आज त्यांनी केलेली युती बेगडी आहे, खरी युती नाही, म्हणून असे अपक्ष उभे आहेत. तालुक्‍याचा आमदार विकासाचे काम करीत नाही. जनतेशी बोलत नाही हसत नाही? तालुक्‍यातील रस्त्यांची अवस्था वाईट असून एकही रस्त्याचे काम धड नाही. केलेल्या रस्त्याला सर्वत्र खड्डेचखड्डे पडलेत. खड्ड्यांचा लोकांना त्रास होतोय, पण यांना काहीही वाटत नाही.

मागील पंचवार्षिक काळात आमदार म्हणून ज्यांना निवडून दिले त्यांनी पाच वर्षांत काय काम केले ते सांगावे. पाच वर्षांच्या काळात ते तालुक्‍याच्या अनेक गावांत गेलेच नाहीत. त्यामुळे कुठले गाव कुठे आहे हे देखील त्यांना माहित नाही, असा घणाघात त्यांनी केला. यावेळी रामदास ठाकूर, वंदना सातपुते, रोहिदास गडदे, कल्याणशील देखणे, अनिल डांगले, बाळासाहेब लिंभोरे, अरुण रौंधळ, राजेश रौंधळ, अनिल डांगले आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन सुनील थिगळे यांनी केले. आभार नंदकुमार साळुंके यांनी मानले.

  • मुख्यमंत्र्यांकडून थापा मारण्याचे काम
    राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे अनाजीपंत आहेत. तामिळनाडूत बैलगाडा सुरू झाल्या, मग महाराष्ट्रात बैलगाडा सुरू का नाहीत? सुरू करण्याच्या थापा या सरकारने केल्याची टीका दिलीप मोहिते यांनी केली.
  • तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघू, मैत्री आणि राजकारण वेगळे आहे. दिलीप मोहिते यांना निवडून आणण्याचे आमचं ठरलंय. शब्द दिलाय कधीच गद्दारी करणार नाही.
    – अनिल राक्षे, संचालक, बाजार समिती

Leave A Reply

Your email address will not be published.