शिरुर-हवेलीत खासदार अमोल कोल्हे यांच्या 3 प्रचार सभा व रोड-शो

न्हावरे: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व स्टार प्रचारक डॉ.अमोल कोल्हे शुक्रवारी (दि.१८) शिरूर – हवेली मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे व मित्रपक्षांचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ शिरूर, वाघोली, तळेगाव ढमढेरे येथे रोड-शो व जाहीर सभा घेणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवींद्र काळे यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना,राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे शुक्रवारी शिरूर-हवेली मतदारसंघात एकाच दिवशी तीन सभा घेणारे आहेत. सकाळी १० वाजता शिरूर शहरामध्ये रोड-शो व सभा होणार आहे. दुपारी १ वाजता तळेगाव ढमढेरे(ता. शिरुर) येथील बाजारतळ मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर ३ वाजता वाघोली (ता. हवेली) शहरामध्ये खासदार कोल्हे यांचा भव्य रोड-शो व सभा आयोजित करण्यात आली आहे .

यावेळी बोलताना रवी काळे म्हणाले की,खासदार कोल्हे यांना शिरूर-हवेली मतदार संघा मधुन जवळपास पंचवीस हजारांचे मताधिक्क मिळाले होते. डॉ. कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस साठी संपूर्ण राज्यभर प्रचार करत असून, त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

डॉ.अमोल कोल्हे यांचे विचार ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थीत रहावे असे आवाहन शिरूर हवेली राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.