MLA Sanjay Gaikwad । शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड हे मागील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. ते नेहमीच विरोधकांवर टीका करत असतात.
टीका करतांना अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत असतात. मात्र सध्या ते एका व्हिडिओमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. त्यात त्यांनी मिरवणुकीत युवकांना काठीने जोरदार मारहाण केली आहे. । MLA Sanjay Gaikwad
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आमदार संजय गायकवाड युवकांना काठीने मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शिवजयंती मिरवणुकी दरम्यानचा आहे. संजय गायकवाड त्यांच्या बॉडीगार्डची काठी घेऊन युवकांना सपासप मारहाण ते करत आहेत.
त्यामुळे शिवजयंती मिरवणुकीत गोंधळ उडाल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मारहाण युवकांना हि मारहाण केल्याचे दिसून येत आहे. । MLA Sanjay Gaikwad
आमदार गायकवाड मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून बुलढाणा शहरातील धक्कादायक घटनेवर पोलिसांकडून काहीच पावले उचलली गेली नाही. यावरून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मात्र, आता या घटनेवर स्वतः संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आपणास अजिबात पश्चाताप नसून उलट ती भूषणावह बाब असल्याचे’ आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. आज शनिवारी आपल्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, “बुलढाण्यात गांजा पिऊन मिरवणुकीत माता भगिनीवर चाकूने हल्ले करणारे एक टोळके कार्यरत आहे. यंदाच्या मिरवणुकीपूर्वी आपण पोलिसांना याची कल्पना दिली होती. मात्र, पोलिसांना मिरवणुकीत ते गवसले नाही.
जयस्तंभ चौकात एक महिला व तिच्या मुलीने याची आपणास माहिती दिली. ‘ते’ चाकूने हल्ला करण्याचा बेतात असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यातील एकाने माझे अंगरक्षक योगेश मुळे यांना खाली पाडले.
त्यामुळे मी त्यांच्या हातातील लाठी घेऊन त्या युवकाला मारहाण केली. माताबहिणीच्या रक्षणासाठी केलेली ती कृती होती, नव्हे तर जयंती समिती अध्यक्ष व आमदार म्हणून ते माझे कर्तव्यच होते. । MLA Sanjay Gaikwad
यामुळे उपद्रवी युवकास केलेल्या मारहाणीचा मला अजिबात पश्चाताप नसून उलट माझ्यासाठी ती भूषणावह बाब आहे. यापुढेही कोणी सार्वजनिक कार्यक्रमात असा उपद्रव केला तर आपण ‘कारवाई’ करणारच असे ते यावेळी ठासून म्हणाले. । MLA Sanjay Gaikwad