राजीनामा दिलेले जेडीएस-काँग्रेस आमदार ‘ऑपरेशन कमळ’बाबत म्हणतात…

बंगळुरू –  कर्नाटकातील राजकारणाने आज पुन्हा एकदा नवे वळण घेतले असून सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसच्या १४ आमदारांनी आज बंगळुरू येथील राजभवनामध्ये कर्नाटक विधासभेचे अध्यक्ष रमेश कुमार यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. सत्ताधारी आघाडीतील आमदारांनी दिलेले राजीनामे हे कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस सरकारसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.

दरम्यान, या राजीनामा सत्राबाबत जेडीएसचे जेष्ठ नेते एच विश्वनाथ यांनी पत्रकारांना माहिती दिली असून ते म्हणतात, “आज जेडीएस व काँग्रेसच्या १४ आमदारांनी एकत्र येऊन विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार यांच्याकडे आमचा राजीनामा सुपूर्द केला असून त्यांनी आमच्या राजीनाम्याबाबत मंगळवारपर्यंत निर्णय देण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही आज राज्यपाल विजुभाई वाला यांची देखील भेट घेतली असून त्यांना सदर राजीनाम्यांची सविस्तर माहिती दिली आहे. सदर कर्नाटक सरकार निर्णय घेत असताना सर्व सदस्यांना विचारात घेऊन काम करत नसल्याने आम्ही आमच्या नाराजीतून राजीनामे सादर केले असून आमच्या राजीनाम्यांशी ‘ऑपरेशन कमळचा’ काडीमात्र संबंध नाही.”

जेडीएस-काँग्रेस आमदारांच्या राजीनामा सत्राबाबत बोलताना कर्नाटक भाजपचे जेष्ठ नेते बी एस येड्डीयुराप्पा यांनी डी के शिवकुमार यांच्यावर राजभवनामध्ये काही आमदारांचे राजीनामे फाडून फेकल्याचा आरोप लावला आहे. एका वृत्तसंस्थेला माहिती देताना येड्डीयुराप्पा म्हणाले की, “राजभवनामध्ये राजीनामा देण्यासाठी गेलेल्या आमदारांचे राजीनामा पत्र डी के शिवकुमार यांनी फाडून फेकले असून त्यांची ही कृती अत्यंत निंदनीय आहे.”

H Vishwanath, JD(S): We have submitted resignation to the Karnataka Assembly Speaker. He assured us he will take a decision by Tuesday. This government did not take everyone into confidence in its functioning. That’s why we’ve resigned voluntarily today https://t.co/LDotjQshHM

— ANI (@ANI) July 6, 2019

Leave A Reply

Your email address will not be published.