शिवकुमार यांनी आमदारांची राजीनामा पत्रे फाडून फेकली – येड्डीयुराप्पा

बंगळुरू – नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पदरात पडलेल्या निराशाजनक पराभवानंतर आज काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस आघाडीच्या ११ आमदारांनी आज आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांच्याकडे सुपूर्द केल्याने देशाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून आमदारांचा राजीनामा कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस सरकासाठी धोक्याची घंटा समजला जात आहे.

सध्या जेडीएस-काँग्रेस आघाडीचे महेश कुमाथल्ली, बी सी पाटील, रमेश जार्किहोली, शिवराम हिबर, एच. विश्वनाथ, गोपालिया, बिरथी बसवराज, नारायण गौडा, मुनीराथना, एस. सोमाशेकर व प्रताप गौडा पाटील बंगळुरूच्या राजभवनात आहेत.

दरम्यान, कर्नाटक भाजपचे जेष्ठ नेते बी एस येड्डीयुराप्पा यांनी डी के शिवकुमार यांच्यावर राजभवनामध्ये काही आमदारांचे राजीनामे फाडून फेकल्याचा आरोप लावला आहे. एका वृत्तसंस्थेला माहिती देताना येड्डीयुराप्पा म्हणाले की, “राजभवनामध्ये राजीनामा देण्यासाठी गेलेल्या आमदारांचे राजीनामा पत्र डी के शिवकुमार यांनी फाडून फेकले असून त्यांची ही कृती अत्यंत निंदनीय आहे.”

B. S. Yeddyurappa, BJP: People are watching the way DK Shivakumar is behaving. He tore resignation letters of some of the MLAs inside the Speaker’s office, who had gone* to resign, it is condemnable. #Karnataka https://t.co/E5TF5YM0K4

— ANI (@ANI) July 6, 2019

हे देखील वाचा : काँग्रेससाठी आजचा दिवस ‘कहीं ख़ुशी कहीं गम’

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)