#CWC19 : टीम इंडियाच्या सुपरफॅन आजीबाई इकडे आहेत, बीसीसीआयने शेअर केला फोटो…

लीड्स – विश्वचषक स्पर्धेत लीड्स मैदानावर जेव्हा भारत आणि श्रीलंका सामना सुरू झाला तेव्हा सर्वाच्या नजरा एक खास चेहरा शोधत होत्या. तो खास चेहरा कोण..? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? तर तो खास चेहरा म्हणजे भारतीय संघाची 87 वर्षीय सुपरफॅन चारूलता पटेल.

सामना सुरू झाल्यानंतर काही वेळातच बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून त्यांचा फोटो शेअर केला. यासोबत बीसीसीआयने लिहिले आहे की, कर्णधार विराट कोहली याने तुम्हाला सामन्याचे टिकीट देण्याचा आश्वासद दिलं होत आणि ते त्यांने पूर्ण केलं. सुपरफॅन चारूलता जी तुमच्या कुटुंबियासोबत सामन्याचा आनंद घ्या.

बीसीसीआयने त्याच्या फोटोसोबत विराट कोहलीचे एक पत्र देखील शेअर केलं आहे. या पत्रात लिहिलं आहे की, प्रिय, चारूलता जी, आमच्या संघाप्रति तुमचं प्रेम आणि उत्साह पाहणं हे आमच्यासाठी प्रेरणादायक आहे. तुमच्या कुटुंबियासोबत सामन्याचा आनंद घ्या. तुम्हाला खूप सार प्रेम.

दरम्यान, फोटोमध्ये चारूलता यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य दिसत आहेत. तसेच चारूलता यांनी भारतीय संघाची ब्लू जर्सी देखील परिधान केली असून त्या भारतीय संघाला प्रोत्साहन देत आहेत. विशेष म्हणजे हा फोटोदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात प्रेक्षकांमधून पिपाणी वाजवत भारतीय संघाला चिअर करणाऱ्या 87 वर्षीय चारुलता पटेल या यंदाच्या फॅन ऑफ द टुर्नामेंट ठरल्या. त्यानंतर चारुलता पटेल या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या आणि सर्वत्र प्रसिध्द झाल्या. त्यातच सामना संपल्यानंतर स्वतःहून टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा त्यांना जाऊन भेटले. दोघांनी त्यांची भेट घेऊन आशीर्वाद देखील घेतले. बघता बघता त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.