जॉनच्या ‘बाटला हाऊस’चा धमाकेदार टीझर पाहिलात का?

बॉलीवूड अभिनेता ‘जॉन अब्राहम’चे देशप्रेमावर आधारित असलेले ‘फोर्स’, ‘फोर्स-2’, ‘मद्रास कॅफे’, ‘सत्यमेव जयते’, ‘परमाणु’ आणि ‘रोमियो अकबर वॉल्टर’ यासारखे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आता त्याचा आगामी ‘बाटला हाऊस’ चित्रपट लवकरच येत आहे.

हा चित्रपटही देश प्रेम आणि देशसेवेवर आधारित आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 2008 साली दिल्लीतील ‘बाटला हाऊस’ चकमक प्रकरणावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटात जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसून येत आहे. येत्या 15 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

19 सप्टेंबर 2008 रोजी सकाळी 11 वाजता दक्षिण दिल्लीतील जामिया नगरातील एल-18 बाटला हाऊस येथे दिल्ली पोलीस आणि इंडियन मुजाहिदीनचे चार अतिरेकी यांच्यात ही चकमक झडली होती. ही चकमक सुमारे दोन तास चालू होती.

Leave A Reply

Your email address will not be published.