निकृष्ट दर्जाच्या बियाणे विक्री प्रकरणी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार – आमदार अशोक पवार

शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बाजरीचे पेरणी केलेले पायोनियर 86 m 38 या बियाण्याची उगवण झाली नसल्याने या कंपनीवर कारवाई करण्यासाठी येणाऱ्या अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले. तसेच पालकमंत्री अजित पवार व कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरूर तालुक्यातील शिरूर, मलठण, न्हावरे, खैरेवाडी ,टाकळी हाजी यास अनेक भागात पायोनियर कंपनीचे बाजरीचे पेरलेले बी याची उगवण झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांची मेहनत त्याबरोबर शेतकऱ्याला आर्थिक मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. यामुळे शेतकऱ्याची ची मेहनत वाया गेली आहे. अशा कंपन्यांवर कडक कारवाई व्हावी यासाठी पालकमंत्री अजित पवार कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगून येणाऱ्या अधिवेशनात याबाबत लक्षवेधी मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“शिरूर तालुक्यातील विविध भागातून आज पर्यंत 23 शेतकऱ्यांनी पायनियर बाजरीची पेरणी करून त्याची उगवण झाली नसल्याचे तक्रार केली आहे.

-निलेश बुधवंत,  कृषी अधिकारी शिरूर पंचायत समिती

निकृष्ट दर्जाचे बियाणे देणाऱ्या कंपनीवर कारवाई  करून नुसतेच बियाण्यांचे नुसकान झाले नाही तर शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली, त्यात अनेक दिवस वाया जाणार आहेत त्यामुळे या कंपनीने शेतकऱ्यांना या सर्वांची बेरीज करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार अशोक पवार यांनी केली आहे.

कंपनी व्यवस्थापन किंवा अधिकारी धूप व जास्त पावसाची कारणे सांगत असतील तर ते एका गावासाठी मान्य केले असते परंतु अनेक गावात तुमच्या कंपन्यांचे बियाण्यांची उगवण झाली नाही त्यामुळे बियाणे निकृष्ट असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.