नवी दिल्ली: भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन सीमेवरील परिस्थितीची माहिती दिली. चीनी सैन्याने देप्सांग उभारलेल्या तळच्या पाशर्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
पॅनगॉंग खोरे आणि देप्सांग भागातील परिसिथतीवर या चार्चेत भर देण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले.
पूर्व लडाखमधील स्थितीचा लष्करप्रमुखांनी दोन दिवस आढावा घेतला. त्यांनी प्रत्यक्ष ताबाबरेषेवर तैनात असणाऱ्या जवानांशी संवाद साधला होता. त्यामुळे सीमेवरील परिस्थितीची कल्पना त्यांनी संरक्षणमंत्र्यांना दिली. गलवान खोरे आणि अन्य भागात चीनने उभारलेल्या लष्करी तळाची त्यांनी माहिती घेतली होती.
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दोन दिवसांचा रशिया दौरा केला होता. या काळात त्यांनी भारताला हव्या असणाऱ्या सुरक्षा उपकरणांच्या सुट्या भागाच्या पुरवठ्याचा वेग वाढवण्याची सूचना केली. चीनशी सुरू असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या या मागणीला महत्व आले होते.